इंडोनेशिया त्सुनामी: मृतांचा आकडा 429 वर

जाकार्ता: इंडोनेशियात शनिवारी रात्री आलेल्या त्सुनामीतील मृतांची संख्या 429 वर पोहोचली आहे. तर दिड हजार लोक यात जखमी असल्याचे वृत्त आहे. सुंदा सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर शनिवारी रात्री त्सुनामीचा तडाखा बसल्याने मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. या त्सुनामीचा दक्षिण सुमात्रा आणि पूर्वेकडील जावा किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. या घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

क्रॅक्‍टो ज्वालामुखी फुटल्यामुळे त्सुनामी आल्याची माहिती इंडोनेशियातील अधिकाऱयांनी दिली आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर समुद्राच्या आत भूस्खलन झाले आणि मोठ्या प्रमाणात लाटा उसळल्या. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्रात पुन्हा उंच लाटा येऊ शकतात, अशी शक्‍यता आपत्ती व्यवस्थापन संस्थेने वर्तवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अद्यापही शोध आणि बचावकार्य सुरू असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे येथे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

‘शोध मोहिमेमध्ये पाण्यात मृतदेहांचा शोध सुरू आहे. अजून 154 जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. पांडेग्लाग, सेरांग, दक्षिण लामपुंग, पेनावारन आणि तेंग्गामुस येथील कोपरान्‌-कोपरा धुंडाळला जात आहे, अशी माहिती ‘नॅशनल डिझास्टर मिटिगेशन एजन्सी’चे प्रवक्ते सुतोपो पुर्वो नुग्रोहो यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)