इंडोनेशियात शक्तीशाली भुकंपानंतर त्सुनामीचा तडाखा, 384 जणांचा मृत्यू

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील सुलावेसी बेटाला शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 7.5 एवढी होती. या भूंकपामुळे कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती, मात्र या भूकंपानंतर पालू शहरातील काही भागाला त्सुनामी लाटांचा तडाखा बसला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या नैसर्गिक आपत्तीत 100 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सकाळी आले होते. मात्र त्यानंतर आता मृतांच्या संख्येत वाढ झाली असून दुपारी पावणे एक च्या सुमारास 384 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती एएफपीच्या आपत्ती संस्थेने एका वृत्तसंस्थेला दिली आहे.

दरम्यान, या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देशाच्या आपत्ती निवारण विभागाने दिला होता. त्यानंतर काहीवेळाने त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला. भूकंपानंतर पालू शहरातील काही भागाला त्सुनामी लाटांचा तडाखा बसला आहे. याचा सुमारे साडे तीन लाख लोकांना फटका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)