आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी इंदिरा गांधी स्टेडियम योग्य – लालचंद रजपूत

भौतिक सुविधांची पूर्तता केल्यास बीसीसीआयकडे सामन्यासाठी आग्रह धरणार

सोलापूर – सोलापूरचे इंदिरा गांधी स्टेडियम वानखेडे स्टेडियमपेक्षासुद्धा मोठे आहे.येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने होण्यास काही अडचणी नाहीत.मात्र काही भौतिक सुविधांची पूर्तता केल्यास एका वर्षभरात सोलापूरचे हे इंदिरा गांधी स्टेडियम आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज असेल असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू लालचंद रजपूत यांनी व्यक्त केले.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियमचा विकास केला जाणार आहे. कोटींचा विकास आराखडा स्मार्ट सिटी प्रशासनाने तयार केला आहे.त्या अनुषंगाने स्टेडियमची पाहणी शुक्रवारी दुपारी करण्यात आली.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रजपूत यांनी स्टेडियमबाबत मत मांडले.

सोलापूरचे हे इंदिरा गांधी स्टेडियम चांगले आणि भव्यदिव्य आहे. हे मैदान वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठे आहे.येथे आंतरराष्ट्रीय सामने होण्यास काहीही अडचण नाही.आपण यापूर्वी या मैदानावर देवधर ट्रॉफी सामना खेळलो आहे.संपूर्ण मैदान तयारच आहे.फक्त खेळपट्टी, औटफिल्ड,खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूम, अंपायर व मीडिया रूम या सुविधा उपलब्ध करून दिल्यास आपण बीसीसीआयकडे प्रथम श्रेणीचे सामने भरविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

दरम्यान आयुक्त तावरे म्हणाले,इंदिरा गांधी स्टेडियमचा विकास केला जाणार असून क्रिकेटसह हॉलीबॉल, कबड्डी,स्केटिंग रिंग,टेनिस, कराटे,बॅडमिंटन, टेबल टेनिस यासह अन्य खेळांना याच मैदानावर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.त्याशिवाय व्यायामशाळा,सुसज्ज पार्किंग,स्विमिंग पूल नूतनीकरण, सुसज्ज ग्रंथालय,प्रकाश व्यवस्था,सीसीटीव्ही आदी सुविधा केल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)