स्वत:चा मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात भारताला यश 

चेन्नई – भारताचा पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर लवकरच आपल्या मोबाइल, सर्व्हिलान्स कॅमेरा आणि स्मार्ट मीटर्सना बळ पुरविणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रासने शक्‍ती नावाच्या या मायक्रोप्रोसेसरचा विकास केला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, चंदीगढच्या सेमी कंडक्‍टर प्रयोगशाळेत मायक्रोचिपसह या मायक्रोप्रोसेसरची निर्मिती करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे आयात करण्यात आलेल्या मायक्रोचिपवरील निर्भरता कमी होणार आहे. या मायक्रोचिपमुळे सायबर हल्ल्यांचा धोका देखील घटणार आहे.

सद्यःकाळात डिजिटल इंडियात असंख्य ऍप्सना कस्टमाइज्ड प्रोसेसर कोरची आवश्‍यकता भासते. आमच्या नव्या डिझाईनसह या सर्व गोष्टी अत्यंत सोप्या होणार असल्याचा दावा आयआयटीएमच्या राइज लॅबचे मुख्य संशोधक कामकोटी विजीनाथन यांनी केला आहे. हे मायक्रोप्रोसेसर उच्च वेगाच्या प्रणाली आणि सुपर कॉम्प्युटर्सना संचालित करण्यासाठी वापरले जातात अशी माहिती देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मायक्रोप्रोसेसरने भारतात अगोदरच अनेक ग्राहक मिळविले आहेत. आयआयटी मद्रास याकरता 13 कंपन्यांच्या संपर्कात आहे. आता संबंधित पथक पराशक्‍तीसह तयार असून हा सुपर कॉम्प्युटरमध्ये वापरला जाणारा अत्याधुनिक मायक्रोप्रोसेसर आहे. हा सुपर स्केल प्रोसेसर डिसेंबर 2018 पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)