विविध क्षेत्रांतील सुधारणांमुळे भारताचे मानांकन वाढले : अरुण जेटली

उद्योग सुलभतेत आणखी आगेकूच करू 

नवी दिल्ली – केंद्र सरकारने अनेक आघाड्यावर चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे व्यवसाय सुलभता प्रक्रियेत भारताने गेल्या एक वर्षात प्रचंड प्रगती केली आहे. जागतिक बॅंकेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून भारताने 100 व्या स्थानावरून 77 व्या स्थानावर झेप घेतली आहे. आगामी काही वर्षातच भारत या यादीत पहिल्या

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पन्नासमध्ये येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी भारताचा क्रमांक जगात 100 वा होता. त्यापूर्वीच्या वर्षी तो 126 वा होता. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यात तब्बल मोठी सुधारणा झाली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत एवढी मोठी सुधारणा दाखविणारा भारत सध्या एकमेव देश आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
ते म्हणाले की, टीका होत असूनही सरकारने अनेक आघाड्यावर सुधारणा केल्या आहेत. जीएसटी करप्रणाली लागू केली आहे. त्याचबरोबर एकाच बाबीला अनेक ठिकाणाहून परवानगी घेण्याची पद्धत बंद केली आहे. त्याचबरोबर आणखी काही निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक बॅंक प्रत्येक वर्षी असे सर्वेक्षण करते. या सर्वेक्षणासाठी व्यवसाय प्रारंभ करणे, बांधकाम परवान्यांना लागणारा वेळ व अटी, वीज मिळण्याची प्रक्रिया आणि वेळ, कर्जपुरवठयाची सुविधा, कर देण्यातील सुविधा, व्यापारात होणारा सीमांचा अडथळा, करारांची पूर्तता आणि दिवाळखोरी प्रक्रियेतील सुलभता हे निकष लावले जातात. यापैकी सहा निकषांमध्ये भारताचे स्थान लक्षणीयरित्या सुधारले आहे.

बॅंकेकडून 190 देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. न्यूझीलंड या देशाला प्रथम क्रमांक मिळाला असून अमेरिकेचे स्थान आठवे आहे. चीनला 46 वे स्थान मिळाले असून त्याच्या स्थानात एकाची घट झाली आहे. पाकिस्तान भारताच्या बराच मागे असून त्याचा क्रमांक 136 वा आहे. अहवालात भारताच्या आर्थिक धोरणांची प्रशंसा करण्यात आली आहे. जीएसटी प्रणालीमुळे व्यापार आणि उद्योगांमध्ये सुलभता आल्याचे सांगण्यात आले आहे. भारतात आता उद्योजकाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर भिन्न भिन्न आवेदने भरून देण्याचा त्रास घ्यावा लागत नाही. सरकारने अनेक आवेदन एकत्र करून सुलभीकरण केले आहे. कर भरणेही सोपे झाले आहे, असे सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे धंदा बुडीत खाती गेल्यास तो बंद करण्याची प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे. कर्जपुरवठा आणि वीज पुरविण्याच्या संदर्भातही भारताची स्थिती गेल्या चार वर्षांमध्ये बदलली आहे. एकंदर वातावरणात सकारात्मक परिवर्तन झाले असून त्यामुळे उद्योग आणि व्यापार यांना प्रोत्साहन मिळत आले. 2012 च्या आर्थिक वर्षात भारताचा या सूचीत क्रमांक 142 वा होता. चीन भारताच्या खूपच आघाडीवर होता. मात्र गेल्या चार वर्षांमध्ये स्थिती बरीच सावरलेली आहे. नोकरशाहीचा अडथळा कमी होऊ लागला आहे. व्यवसाय परवाना त्वरित दिला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)