जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 14 व्या दिवशी भारतानं बाॅक्सिंगमध्ये सकाळी एक सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता ‘ब्रिज’ या क्रीडाप्रकारात सुध्दा भारतानं आणखी एक सुवर्णपदक पटकाविले आहे.

‘ब्रिज’ या क्रीडाप्रकारात पुरूष दुहेरी गटात प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार यांनी सुवर्णपदक पटकावून भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 15 वर नेली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची एकूण संख्या 67 अशी झाली आहे. यामध्ये 15 सुवर्ण, 23 रौप्य आणि 29 कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत आठव्या स्थानावर पोहचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)