अफगाणिस्तानबाबतची शांती परिषद मॉस्कोमध्ये भारताचा अनौपचारिक सहभाग 

मॉस्को – अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापनेसाठी अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये शांतता परिषदेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या परिषदेला पाकिस्तान, चीन आणि इराणचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तर भारताचा या परिषदेत अनौपचारिक सहभाग आहे. अफगाणिस्तानच्या धोरणाला अनुमोदन देण्यापुरताच भारताचा सहभाग मर्यादित असेल आणि तालिबानशी चर्चेसाठी भारत नसेल, असे भारताच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

रशियाचे विदेश मंत्री सेर्जी लावरोव यांनी या परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी परिषदेची भूमिका स्पष्ट केली. अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न या परिषदेतून केले जातील, असे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानमध्ये अंतर्गत संवाद वाढवून राष्ट्रीय ऐक्‍य निर्माण करण्याच्या प्रक्रियेसाठी ही परिषद आहे, असेही ते म्हणाले.
मॉस्कोतील अमेरिकेच्या दूतावासाने या परिषदेसाठी दूत पाठवले असून भारत, अफगाणिस्तान, इराण, चीन, पाकिस्तान आणि अन्य काही देशांचे प्रतिनिधीही या परिषदेला उपस्थित आहेत. अफगाणिस्तानातील भारताचे माजी राजदूत अमर सिन्हा आणि पाकिस्तानातील माजी उच्चायुक्‍त टी.सी.ए. राघवन हे देखील भारताच्यावतीने परिषदेला अनौपचारिकपणे सहभागी झाले आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)