भारताच्या सामर्थ्यात वाढ

अण्विक पाणबुडीमुळे आता चीनही टप्प्यात

नवी दिल्ली – भारताची पहिली अण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत आता पुर्णपणे कार्यान्वित झाली आहे. या पाणबुडीची पहिली गस्ती मोहीम पुर्ण झाल्याचे आज जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता या पाणबुडीद्वारे चीनवरही हल्ला करण्याची क्षमता भारतीय नौदलाला प्राप्त झाली आहे. गेली वर्षे ही पाणबुडी उभारण्याचे काम सुरू होते. ते काम आता पुर्ण झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या प्रकल्पाच्या पुर्ततेच्या कामी झटणाऱ्या सर्वांचेच आपण अभिनंदन करीत असून या कार्याच्या पुर्णत्वाची इतिहासात दखल घेतली जाईल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

6 हजार टन वजनाची ही पाणबुडी कार्यान्वित करण्याचे कार्य गेली अनेक वर्षे सुरू होते त्याची पुर्तता झाल्याने ही पाणबुडी आता पुर्णपणे कार्यान्वित झाली आहे. अण्विक शक्तीच्या आधारे भारताला ब्लॅक मेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ही आण्विक पाणबुडी हे चोख उत्तर आहे असेही मोदी यावेळी म्हणाले. रशिया, अमेरिका, फ्रांस,चीन आणि ब्रिटन या पाच अण्वस्त्रधारी देशांनंतर नंतर अशा क्षमतेची पाणबुडी असलेला भारत हा आता एकमेव देश ठरला आहे. सागरी भागातून भुभागावरील कोणत्याही महत्वाच्या शहरावर आण्विक क्षेपणास्त्राचा मारा करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. अशा हल्ल्यानंतरही ही पाणबुडी शत्रुच्या नजेला पडत नाही हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ती भारतीय संरक्षण सज्जतेसाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजाऊ शकते. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या अण्विक कमांडच्या अधिपत्त्याखालीच या पाणबुडीच्या उभारणीचे काम सुरू होते. ते पुर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांबरोबरच संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनीही नौदलाचे आणि त्यांच्या तंत्रज्ञ, वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

विजय दिवसाच्या दिनी सुरू झाले होते काम
आयएनएस अरिहंत या पाणबुडीच्या उभारणीचे काम 26 जुलै 2009 मध्ये तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते विजय दिवसाचे औचित्य साधून सुरू झाले होते. भारताने कारगीलवर मिळवलेल्या विजया प्रित्यर्थ विजय दिवस लष्करातर्फे साजरा केला जातो. अनेक प्रदीर्घ चाचण्या घेतल्यानंतर 23 फेब्रुवारी 2016 रोजी ही पाणबुडी तयार झाल्याचे घोषित करण्यात आले आणि त्यानंतर ऑगस्ट 2016 मध्ये ती नौदलात कार्यान्वित करण्यात आली. अण्विक इंधनावर ही पाणबुडी चालते. अण्विक इंधनाचे मॉडेल बनवण्याचे काम सप्टेंबर 2006 मध्ये कलकप्पम येथे सुरू झाले होते. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनतर हा पाणबुडीसाठीच्या अण्विक इंधनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष आयएनएस अरिहंतच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)