दहशतवादीविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला पूर्ण पाठिंबा 

वॉशिंग्टन – पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने पुलवामा इथे घडवून आणलेला हल्ला हा भीषण दहशतवादी हल्ला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत ट्रम्प प्रशासनाकडून भारताला पूर्ण पाठिंबा असून पुलवामा हल्ल्यातील सर्व दोषींना पाकिस्तानने कठोर शिक्षा करावी, असेही ट्रम्प यांनी ठणकावले आहे.

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये 14 फेब्रुवारीला “सीआरपीएफ’च्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 40 जवान शहिद झाले आहेत. या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणावामध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्‍वभुमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी एकत्रपणे विचार करावा, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“पुलवामा हल्ल्याची दृश्‍ये आपण बघितली आहेत. तसेच या हल्ल्याशी संबंधित वृत्तही वाचले आहे. हा हल्ला भीषण दहशतवादी हल्ला होता. याबाबत योग्यवेळी वक्‍तव्य केले जाईल. मात्र भारत आणि पाकिस्तानने एकत्रपणे याचा विचार केल्यास अधिक चांगले होईल.’असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेने भारत सरकरशी चर्चा केली असून दहशतवादाच्या मुद्दयावर पाठिंबाही दिला आहे, असे एका अन्य पत्रकार परिषदेमध्ये अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने सांगितले. दहशतवादाच्या विरोधाच्या मुद्दयावर अमेरिका आणि भारताचे सहकार्याचे संबंध आहेत.

त्यामुळे दहशतवादाच्या बिमोडासाठी भारत सरकारबरोबरकाम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते रॉबर्ट पल्लादिनो यांनी सांगितले. या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित आणि संयुक्‍त राष्ट्राकडून घोषित केलेली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आहे. दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळू नये यासाठी संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमधील देशांनी याचा पाठपुरावा करावा असे आवाहनही आपण करत आहोत. अमेरिकेच्यावतीने या संदर्भात पाकिस्तानशीही संपर्क साधला आहे. या प्रकरणाचा तपास करून दोषींना शिक्षा करावी, असा आग्रह पाकिस्तानकडे धरला आहे, असेही पल्लादिनो म्हणाले. अमेरिकेतील खासदारांनीही पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या सिनेटमधील 100 पैकी 20 खासदारांनी भारताला पाठिंबा देऊ केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)