मसुद अझहरबाबतचा भारताचा पाठपुरावा सुरूच

नवी दिल्ली – संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने मसुद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, यासाठी भारताकडून पाठपुरावा अजूनही सुरुच आहे. यासाठी थोडा संयम दाखवून अधिक तयारी केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये मसुद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याबाबतच्या प्रस्तावाला चीनकडून आडकाठी घालण्यात आल्यानंतर ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानकडून जैश ए मोहम्मदच्या विरोधात जी पावले उचलली गेली आहेत, ती अत्यंत विनोदी आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवाद हा मोठा गंभीर मुद्दा आहे, याची चीनला जाणीव आहे. पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी गट सक्रिय आहेत, हे चीनला माहित आहे. चीनकडून मसुदविरोधी प्रस्तावावर भारताने नाराजी व्यक्‍त केली असली तरी या संदर्भातील दीर्घकाळ चालणाऱ्या चर्चेबाबत संयम बाळगला जात आहे. मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्यास चीनकडून सातत्याने विरोध आहे. पाकिस्तानबाबत चीनला काही आक्षेप आहेत. त्या शंकांचे निरसन झाल्यावर चीनकडून या प्रस्तावाला पाठिंबा मिळू शकेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)