#NZvIND : भारतीय महिलासंघाचा न्यूझीलंडवर 9 विकेटने दणदणीत विजय

न्यूझीलंड (नेपियर) – भारतीय महिला संघाने तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेत नेपियर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाचा 9 विकेट राखून पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा महिला संघ 48.4 षटकांत सर्वबाद 192 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 193 धावांचे आव्हान 1 विकेट गमावत केवळ 33 षटकांतच पूर्ण करत दणदणीत विजय मिळविला. स्मृति मन्धानाने नाबाद 105* धावांची खेळी केली. तिला या शानदार खेळीबदल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय कर्णधार मिताली राज हिने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या सोफी डिवाईन (28) आणि सुजी बेट्स (36) यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. त्यानंतर एमी सैटर्थवेट (31) आणि अमेलिया केर (28) यांनी न्यूझीलंडचा डाव संभाळण्याचा प्रयत्न केला पण भारतीय गोलंदाजीपुढे त्याचा निभाव लागला नाही. न्यूझीलंडचा महिला संघ सर्वबाद 192 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून गोलंदाजीत एकता बिष्ट आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी 3 विकेटस घेतल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाच्या फलंदाजानी न्यूझीलंड गोलंदाजीची चांगलीच धूलाई केली. स्मृति मन्धाना आणि जेमिमाह रोड्रिग्स यांनी शतकी भागिदारी केली. रोड्रिग्स हिने 94 चेंडूत 9 चौकारसह 81 धावा केल्या. भारतीय संघाला विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असताना रोड्रिग्स बाद झाली, तर स्मृतीने 104 चेडूंत 9 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 105 धावा केल्या. स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले आपले चौथे एकदिवसीय शतक पूर्ण करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

सक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड 190/10 ( 48.4)
भारत 193/1 (33)

भारतीय संघाचा 9 विकेट राखून विजय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)