तणाव वाढू नये हीच भारताची इच्छा : सुषमा स्वराज यांचे चीनमध्ये प्रतिपादन

वुझेन – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढू नये अशीच आमची इच्छा आहे असे प्रतिपादन भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. त्या सध्या भारत-रशिया-चीन या तीन देशांच्या एका परिषदेसाठी चीनमध्ये आल्या आहेत. तेथे बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. आम्ही अत्यंत संयमाने आणि जबाबदारीनेच वर्तन करीत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी हद्दीत घुसुन भारताने केलेल्या कारवाईचे त्यांनी समर्थन केले. त्या म्हणाल्या की पुलवामा येथे सीआरपीएफच्या 40 जवानांची हत्या झाल्याच्या प्रकारामुळे संपुर्ण देशवासियांमध्ये संतापाची भावना होती. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी गटांच्या विरोधात कारवाई करणे भारताला भाग पडले. पण या कारवाईत आम्ही लष्करी किंवा नागरी भागाला हानी पोहचवलेली नाही. दहशतवादी गटाकडून होणाऱ्या संभाव्य कारवाया हाणून पाडण्यासाठीच आम्ही ही कारवाई केली त्याला लष्करी कारवाईचे स्वरूप नव्हते असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या हल्ल्यात नागरी वस्त्यांमध्ये जीवित हानी होणार नाही याचीही पुरेपुर काळजी भारताने घेतली होती असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. आता हा तणाव आणखी वाढू नये अशी आमची इच्छा आहे असे त्या म्हणाल्या. पुलवामा येथे जैश ए महंमदने हल्ला केल्यानंतर त्या अनुषंगाने कारवाई करण्याऐवजी पाकिस्तानने या संघटनेचा त्यात हात असल्याची बाबच धुडकाऊन लावली याकडेही सुषमांनी यावेळी लक्ष वेधले.

जैश ए महंमद संघटनेचा प्रमुख मसुद अझर याला दहशतवादी घोषित करून त्याच्यावर निर्बंध लागू करावेत असा प्रस्ताव संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात प्रलंबीत आहे पण हा प्रस्ताव चीनने रोखून धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनी नेत्यांशी आपली चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)