#ISSFWorldCup – नेमबाजी विश्वचषकामध्ये अपुर्वी चंडेलाचे विश्वविक्रमी सुवर्णपदक

नवी दिल्ली – जागतिक नेमबाजी विश्वचषक 2019 स्पर्धेमध्ये 10 मी. एअर रायफल प्रकारात अपूर्वी चंडेलाने सुवर्ण पदक पटकावले आहे. ही कामगिरी करताना अपूर्वीने 252.9 गुणांसह विश्व विक्रमाचीही नोंद केली.

अप्रतिम कौशल्य आणि सातत्यपूर्ण अचूक लक्ष्यवेध करत अपूर्वी चंडेला हिने 10 मी. एअर रायफल क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत 252.9 गुण संपादित करत पहिले स्थान पटकाविले. तत्पूर्वी झालेल्या पात्रता फेरीत अपूर्वी हिने 629.3 गुणासह चौथे स्थान मिळवित अंतिम फेरीत धडक मारली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या क्रीडा प्रकारात अंजली भागवतनंतर सुवर्णपदक जिंकणारी अपूर्वी चंडेला ही दुसरी नेमबाज ठरली आहे. अपूर्वीने यापूर्वीच मागील वर्षात झालेल्या जागतिक विश्वचषक स्पर्धेत 2020 टोक्यो आॅल्मिपिकचे तिकीट प्राप्त केले आहे. अपूर्वीचे हे तिसरे जागतिक पदक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)