‘जी-20’ परिषदेमध्ये भारताने मांडला 9 कलमी अजेंडा 

ब्युनोस आयर्य: फरार आर्थिक गुन्हेगारांच्या संदर्भात कठोर आणि सक्रिय सहकार्यासाठी भारताने “जी -20′ देशांच्या परिषदेमध्ये 9 कलमी अजेंडा मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी परिषदेत आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय वित्त आणि कर रचनेसंदर्भातील दुसऱ्या सत्रामध्ये हा अजेंडा मांडला.

“गुन्हेगारांच्या मालमत्ता गोठवण्यासारख्या कायदेशीर कारवाईसाठी सहकार्य, आर्थिक गुन्हेगारांना लवकर माघारी आणणे आणि गुन्ह्यांच्या परिणामकारक प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात यावा.’ असे या अजेंडामध्ये म्हटले गेले आहे. “जी-20′ देशांनी आर्थिक गुन्हेगारांना प्रवेश आणि सुरक्षित आश्रय नाकारावा अशी संयुक्‍त यंत्रणा अस्तित्वात आणावी, अशी अपेक्षाही भारताने व्यक्‍त केली आहे. भ्रष्ट्राचार, आंतरदेशीय संघटित गुन्हे आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित संयुक्‍त राष्ट्राचा विरोधी ठरावाची पूर्णपणे आणि परिणामकारकपणे अंमलबजावणी व्हायला हवी, असे या अजेंड्यामध्ये म्हटले आहे.

आंतरदेशीय पातळीवरून होणाऱ्या सामुहिक आर्थिक गुन्हेगारील रोखण्यासाठी “फायनान्शियल ऍक्‍शन टास्क फोर्स’ची निर्मिती केली जावी. त्यामाध्यमातून देशांमधील सक्षम अधिकाऱ्यांशी आणि वित्तीय गुप्तचर विभागांशी माहितीची आदान प्रदान व्हायला हवी. या फायनान्शियल टास्क फोर्सने एक सामायिक आणि निकषावर आधारीत गुन्हेगारांची ओळख, प्रत्यार्पण आणि फरार आर्थिक गुन्हेगारांच्या कायदेशीर प्रत्यार्पणाशी संबंधित निकष निश्‍चित करावेत. या टास्क फोर्सने या साठी “जी-20′ देशांना देशांतर्गत कायद्यानुसार सहकार्य करावे. असेही या अजेंड्यामध्ये म्हटले आहे. मनी लॉंडरिंग, दहशतवाद्यांच्या वित्तसहाय्य आणि आर्थिक यंत्रणांना अस्थिर करण्यास कारणीभूत असलेल्या अन्य धोक्‍यांच्या प्रतिबंधासाठी 1989 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आंतर सरकारी यंत्रणेअंतर्गतच हा टास्कफोर्स कार्यरत असेल.

याशिवाय आर्थिक गुन्हेगारीशी संबंधित अनुभव आणि प्रकरणांच्या तपासातील यशाविषयीच्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी एक समान व्यासपीठ निर्माण करण्याचाही आग्रह भारताने धरला. प्रत्यार्पण आणि कायदेशीर सहकार्याशी संबंधित सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याचीही भारताची भूमिका आहे.
आपल्या रहिवासी देशात करचुकवेगिरी करून फरार झालेल्या आर्थिक गुन्हेगारांची मालमत्ता शोधून काढण्यात”जी-20′ ने पुढाकार घ्यावा, असेही या अजेंड्यामध्ये म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)