भारतीय प्रेक्षकांना भावताहेत ‘हॉरर’ सिनेमे

मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘स्त्री’ चित्रपट आणि या आठवड्यात भारतात प्रदर्शित झालेला हॉलीवूड हॉरर चित्रपट ‘द नन’ हे दोन हॉरर चित्रपट सध्या चांगली कमाई करत आहेत. ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श याच्या मतानुसार कॉमेडी, रोमान्स पेक्षा प्रेक्षकांना हॉरर चिपत्रपट सिनेमागृहात खेचत आहे.

‘स्त्री’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर आठव्या दिवशी ४.३९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची कमाई सध्या ६४.७८ कोटींच्या पुढे गेली असून हा चित्रपट ७० कोटींचा टप्पा गाठेल, असेही ते म्हणाले. हा चित्रपट फक्त  २० कोटी रुपये खर्चून तयार केला आहे.

काल शुक्रवारी दि. ७ रोजी लैला – मजनु, पलटण असे काही भारतीय चित्रपट रिलीज झाले ,त्यांना बॉक्स ऑफीसवर फारशी उत्तम कामगिरी करता आली नाही. परंतु, ‘द नन’ या ‘हॉलीवूड’ चित्रपटाने ७.७५ कोटी रुपये कमविले आहेत. भारतीय प्रेक्षकांना हॉरर चित्रपट जास्त भवताहेत हे यावरून दिसून येते.

‘स्त्री’ आणि ‘द नन’ या दोन चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची तुलना केली तर ‘द नन’ स्त्री पेक्षा वरचढ ठरला आहे. या चित्रपटाने ‘स्त्री’ पेक्षा १ कोटी रुपये जास्त कमविले आहेत.’स्त्री’चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या कमाई ६.८३ कोटीच्या आसपास होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)