अमेरिकेच्या तुरुंगात 2,400 घुसखोरीच्या आरोपातील भारतीय 

वॉशिंग्टन – आश्रय मिळवण्यासाठी बेकायदेशीरपणे अमेरिकेची सीमा ओलांडणारे सुमारे 2,400 भारतीय सध्या अमेरिकेतील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत आहेत. यामध्ये पंजाबमधील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे, अशी माहिती उघड झाली आहे. भारतात होत असलेल्या वांशिक छळ किंवा हिंसाचारामुळे त्यांनी अमेरिकेत आश्रय घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेतील 86 तुरुंगांमध्ये 2,382 भारतीय नागरिक बेकायदेशीर घुसखोरीच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत, असे “नॉर्थ अमेरिकन पंजाबी असोसिएशन’ (एनएपीए) कडून मिळवलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. या वर्षी 10 ऑक्‍टोबरला मिळालेल्या माहितीनुसार कॅलिफोर्नियाच्या ऍडलांटो इमिग्रेशन ऍन्ड कस्टम्स एन्फोर्समेंट प्रोसेसिंग सेंटरमध्ये 377. इम्पिरीयल रिजनल ऍडल्ट डिटेन्शन फॅसिलिटीमध्ये 269, फेडरल करेक्‍शनल इन्स्टिट्युशन विक्‍टोरविलमध्ये 245 आणि वॉशिंग्टनच्या टाकोमा आयसीई प्रोसेसिंग सेंटरमध्ये 115 भारतीयांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हजारो भारतीयांच्या घुसखोरीचे हे प्रकरण गंभीर आहे, असे “एनएपीए’चे अध्यक्ष सतनाम एस चहाल यांनी सांगितले.
पंजाबमधील मानवी तस्करीविरोधात गेल्या काही वर्षांपासून चहाल कार्यरत आहेत. अमेरिकेत पंजाबी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी सातत्याने होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश मिळवून देण्यासाठी एका व्यक्‍तीमागे 35 ते 30 लाख रुपये मागितले जातात.

पंजाबी नागरिकांना या मानवी तस्करीपासून रोखण्यात यावे, यासाठी पंजाब सरकारने प्रयत्न करण्याचे आवाहनही चहाल यांनी केले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काही कठोर निर्णयांमुळे अमेरिकेत प्रवेश घेणे अवघड बनले आहे. गेल्या आठवड्यात ट्रम्प प्रशासनाने दक्षिण मेक्‍सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत बेकायदेशीर शरणार्थ्यांच्या प्रवेशास अटकाव करण्याचा निर्णय घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)