#INDvNZ : महिलांसमोर मालिका विजयाचे लक्ष्य

माऊंट मोंगानुई -भारतीय पुरुष संघाने मालिका विजय साकारल्यानंतर भारतीय महिला संघ न्यूझीलंड महिला संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत करून तीन सामन्यांची मालिका खिशात घालण्याचे लक्ष्य ठेऊन मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात उपकर्णधार स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी झुंझार सलमी देत भारताला सहज विजय मिळवून दिला होता.

न्यूझीलंड दौऱ्याच्या अगोदर भारतीय महिला क्रिकेट अनेक वादांमध्ये अडकले होते. त्यात रमेश पोवार आणि मिताली राज यांच्यातील वाद मोठा होता. त्याचा भारतीय महिलांच्या खेळावर दबाव जाणवला नाही. पहिल्या सामन्यात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सांघीक खेळ करत न्यूझीलंडला कमी धावसंख्येत रोखले होते. फिरकीपटू एकता बिस्तने आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले होते तर अन्य फिरकीपटू दीप्ती शर्माने 2 बळी घेत न्यूझीलंडला फिरकीच्या जाळ्यात अडकवले होते. दुसऱ्या सामन्यातही त्यांच्याकडून अशाच कामगिरीचे अपेक्षा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलंदाजीमध्ये स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी चांगली कामगिरी करत अन्य फलंदाजांवर दडपण येऊ दिले नव्हते. या सामन्यातही त्यांनी जर चांगली सलामी दिली तर भारतीय महिलांचा विजय निश्‍चित आहे. त्याचबरोबर 2014-16 मध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला अजिंक्‍यपद मालिकेतील न्यूझीलंड विरुद्धच्या 2-1 पराभवाची परतफेडही होईल. ही मलिका जिंकली तर भारतीय संघ आयसीसी अजिंक्‍यपदाच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी विराजमान होईल आणि 2021 मध्ये होणाऱ्या विश्‍वचषकासाठी भारतीय संघ थेट पात्र ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)