भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात-महिला हॉकी विश्वचषक 

LONDON - Vitality Women's Hockey World Cup India - Ireland Photo: Ireland celebrate the 0-1. COPYRIGHT WORLDSPORTPICS RODRIGO JARAMILLO

पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ असा पराभव

लंडन : भारतीय महिलांचे  हॉकी विश्वचषकात अंतिम चार संघात पोहचण्याचे स्वप्न आज पुन्हा धुळीस मिळाले. त्यांना पेनल्टी शूट आऊटमध्ये आयर्लंडकडून ३-१ असा पराभव पत्करावा लागला. भारताची कर्णधार राणी रामपाल, मोनिका आणि नवजोत कौर शूट आऊट मध्ये गोल करण्यात अपयशी झाले. याचा फटका भारतीय संघाला बसला.
सामन्यातील पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला परंतु त्यांना गोल करण्यात यश आले नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी बचावावर भर दिला. चौथ्या सत्रात भारतीय संघाने खूप आक्रमक खेळ केला आणि त्याचा फायदा म्हणून भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु भारतीय कर्णधार राणी रामपाल या संधीचे सोने करू शकली नाही.
नियमित वेळेत सामन्याचा निकाल लागू न शकल्याने  या सामन्यात पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले त्यात भारतीय  संघाने ३-१ असा सामना गमावला. दोन्ही संघातील गोलरक्षकांनी उत्तम खेळ केला
भारतीय संघाला यंदाच्या विश्वचषकात उपांत्यफेरी गाठण्याची सुवर्ण संधी होती परंतु त्यात भारतीय महिला हॉकी संघाला अपयश आले. या वेळच्या स्पर्धेत उपांत्यफेरीत प्रवेश करून महिलांचा संघ  मागील ४४ वर्षाचा इतिहास बदलू शकले असते. १९७४ मध्ये भारतीय महिलांच्या संघाने उपांत्यफेरी गाठली होती. मागील विश्वचषकात भारतीय संघ आठव्या स्थानावर राहिला होता.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)