आशियाई क्रीडा स्पर्धा : भारतीय महिला ‘स्क्वॅश’ संघास ‘रौप्यपदक’

जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 14 व्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. स्क्वॅश या क्रीडाप्रकारात काल पुरूष संघाने कांस्यपदक पटकाविल्यानंतर आज महिलांच्या स्क्वॅश संघाने रौप्यपदक पटकाविले आहे.

आज आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या स्क्वॅश या खेळातील अतिंम सामन्यात भारतीय महिला संघाचा हाँगकाँगकडून पराभव झाला. हाँगकाँगच्या संघाने भारतीय संघाचा 2-0 असा पराभव करत अतिंम फेरीतील सामना जिंकत सुवर्णपदक जिंकले. या पराभवामुळे भारतीय महिला संघाला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

भारताच्या खात्यात आतापर्यत 68 पदक जमा झाले आहेत. यामध्ये 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 29 कांस्यपदकाचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)