भारतीय महिला क्रिकेट संघाची न्यूझीलंडशी सलामीची लढत

महिला टी-20 विश्‍वचषक स्पर्धा

दुबई: यंदाच्या वर्षअखेरीस वेस्ट इंडीजमध्ये रंगणाऱ्या महिलांच्या टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघासमोर सलामीच्या लढतीत न्यूझीलंडच्या महिला संघाचे आव्हान आहे. भारतीय महिला संघाने टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत कधीही विजेतेपद पटकावलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येत्या 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान विंडीजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील भारत-न्यूझीलंड सामना पहिल्याच दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी होणार असून पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भारतीय महिलांचा सामना 11 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. भारतीय महिलांचे अन्य दोन सामने 15 नोव्हेंबर रोजी पात्रताफेरीतून आलेल्या संघाशी आणि 17 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियन महिला संघाशी असे होणार आहेत.

तीन वेळा ही स्पर्धा जिंकणारा बलाढ्य ऑस्ट्रेलियन महिला संघ, तसेच माजी विजेता इंग्लंडच्या महिलांचा संघ यांच्यासह एकूण 10 संघांचा या स्पर्धेत सहभाग आहे. विंडीज बेटांमधील तीन मैदानांवर या स्पर्धेतील सामने खेळविले जातील. त्याआधी 7 ते 14 जुलै दरम्यान हॉलंडमध्ये रंगणाऱ्या पात्रता स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारे दोन संघ टी-20 विश्‍वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

महिलांच्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील सर्व 23 सामन्यांचे टेलिव्हिजनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून पंचांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, याकरिता या स्पर्धेत पहिल्यांदाच डीआरएस सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. गतविजेत्या विंडीज महिलांसह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व पात्रतावीर अशा पाच संघांचा अ गटांत समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान व पात्रतावीर असे पाच संघ ब गटांत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)