झुलन गोस्वामीने टी-20 क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

नवी दिल्ली – भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने टी-20 क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने 68 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

झुलन गोस्वामी हिने 68 सामन्यामध्ये 56 बळी घेतले आहेत. 2012 मध्ये तिने आॅस्ट्रेलियाविरूध्द 5 बळी घेतले होते. ही तिची टी-20 मधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तिने आज टी-20 मधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

झुलन हिने तिला आतापर्यत दिलेल्या प्रेम आणि समर्थनाबदल भारतीय महिला क्रिकेट बोर्डाचे आणि संघातील सर्व खेळाडूंचे आभार मानले आहेत. तसेच भारतीय महिला संघास पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतीय महिला क्रिकेट बोर्ड आणि महिला संघानेही झुलन गोस्वामीला तिने टी-20 मध्ये भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानसाठी धन्यवाद म्हटले आहे आणि तिच्या एकदिवसीय आणि कसोटी सामन्यातील पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

झुलन गोस्वामी हिने आतापर्यंत 10 कसोटी आणि 169 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यामध्ये ती सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत प्रथम स्थानावर आहे आणि 200 बळी घेणारी ती पहिली महिला क्रिकेट खेळाडू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)