‘विराट कोहली’च्या नावे आणखी एक विक्रम 

नवी दिल्ली – भारतीय कर्णधार विराट कोहली याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. या सर्व विक्रमामुळेचे त्याची क्रिकेटजगतामध्ये खतरनाक फलंदाज अशी अोळख आहे. रविवारी झालेल्या आॅस्ट्रेलिया विरूध्दच्या तिसऱ्या टी20 सामन्यात विराटने आपल्या नावे आणखी एक असा विक्रम केलाय जो सर्व विरोधी संघाना एक चेतावनी आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या टी20 मध्ये 41 चेंडूत 61 धावा करत संघाला विजय प्राप्त करून दिला. या शानदार खेळीबरोबरच विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.  विराट हा टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही विरोधी संघाविरूध्द सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. विराटने मार्टिन गप्टिल याचे 463 धावाचा विक्रम तोडला आहे.

विराट कोहलीने आॅस्ट्रेलियाविरूध्द आतापर्यंत 14 सामन्यात 476 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो टी20 क्रिकेट प्रकारात कोणत्याही एका विरोधी संघाविरूध्द कमी सामन्यात जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल यांच्या नावे हा विक्रम होता. त्याने पाकिस्तानविरूध्द 15 सामन्यात 463 धावा काढल्या आहेत.

तसेच विराट कोहलीने टी20 क्रिकेट प्रकारात 19 वेळा 50 पेक्षा अधिक धावाची खेळी केली आहे.त्याने रोहित शर्माशी याबाबतीत बरोबरी साधली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)