मी पुन्हा माझा सर्वोत्तम खेळ करतोय : नागल

बंगळुरू – भारताचा आघाडीचा पुरुष एकेरी टेनिसपटू सुमित नागल हा खांद्याच्या दुखापतीतून सावरताना तब्बल तीन महिन्यांनंतर मैदानात परतणार असून पुनरागमना संदर्भात आपल्या तंदुरुस्तीविषयी बोलताना त्याने सांगितले की, तंदुरुस्त होऊन मी माझा नैसर्गीक खेळ करण्याचा प्रयन्त करत आहे आणि सरावात मी माझा सर्वोत्तम खेळ करत आहे. त्यामुळे मी यशस्वी पुनरागमन करेल याची मला खात्री आहे.

सुमित नागलने 2017मध्ये बंगळुरू ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. मात्र, त्यानंतर त्याला आपल्या खेळात सातत्य राखता आले नव्हते आणि त्याचा खेल खालावला होता. त्याच बरोबर मोसमात त्याला दुखापतींनी देखील घेरले होते. त्यामुळे त्याने खेळलेल्या मागील तिन्ही स्पर्धांच्या पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली होती. त्यातच खांद्याच्या दुखापती मुळे तो सलग तीन महिने मैदानाबाहेर राहिला होता. दुखापतींवर मात करून तो बंगळुरू ओपन स्पर्धेमधून पुनरागमन करणार आहे. मागील वेळचा विजेता असल्याचा दबाव न घेता आपला नैसर्गीक खेळ करण्यावर आपला भर असेल, असेही तो यावेळी बोलताना म्हणाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पुढे बोलताना नागल म्हणाला, मी सध्या टेनिस कोर्ट वर खूप वेळ घालवतात आहे. मी जसा अगोदर खेळ करायचो तसाच खेळ मी सध्या करतो आहे. दुखापतींमुळे माझी कामगिरी खालावली होती. त्यामुळे मला अनेक स्पर्धांमध्ये प्राथमिक स्तरावरच पराभव स्वीकारावा लागला होता. मी सध्या सरावावर जास्त भर देत आहे. मात्र, जेंव्हा तुम्ही दुखापतग्रस्त असता त्यावेळी तुम्ही सराव देखील व्यवस्थीत करू शकत नाही. त्याचा परिणाम तुमच्या कामगिरीवर जाणवत असतो, असेही तो पुढे बोलताना म्हणाला. नागल सध्या त्याचे प्रशिक्षक सर्बियाचे मिलोस गॅलेसीस यांच्यासह सराव करत आहे.

त्याने खेळलेल्या मागील तिन्ही स्पर्धात पहिल्याच फेरीत बाहेर पडलेला नागल त्याच्या त्या कामगिरी विषयी म्हणाला, टेनिस हा बेभरवशी खेळ आहे. यामध्ये पुढील सामन्यात काय होईल हे नेमकेपणाने सांगणे खूप कठीण असते. तुम्ही कोणालाही पराभूत करू शकता किंवा कोणाविरुद्धही पराभूत होऊ शकता. भारताचा स्टार एकेरी टेनिसपटू युकी भांब्री दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही, याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला, युकी भांब्री या स्पर्धेत खेळत नसल्याने चाहते दुःखी आहेत. मलाही त्याचा खेळ खूप आवडतो. तो भारताचा आघाडीचा खेळाडू आहे. त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहते गर्दी करत असतात. पण, यंदाच्या वर्षी तो या स्पर्धेत सहभागी नाही त्यामुळे मी देखील दुःखी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)