विश्‍वचषक विजयापेक्षा मोठा विजय – रवी शास्त्री

सिडनी – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकली, यानंतर बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, हा मालिका विजय 1983 साली मिळवलेल्या विश्‍वचषक स्पर्धेतील विजयापेक्षाही मोठा विजय आहे. कारण हा कसोटी मालिकेतील विजय आहे.

याबाबत पुढे बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, भारतीय संघाच्या या कसोटी मालिका विजयाची तुलना 1983 साली भारताने पहिला विश्‍वचषक जिंकला, त्याच्याशीच होऊ शकेल. हा विजय त्याएवढा मोठा किंवा त्याहीपेक्षा मोठा आहे. कारण हा विजय क्रिकेटच्या सर्वात जुन्या प्रकारातील विजय आहे. भूतकाळ हा इतिहास असतो आणि भविष्यात काय होणार हे माहिती नसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्ही जवळपास 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचला आहे. त्यामुळे मला वर्तमानात राहायचे आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करणे हे खूप कठीण काम होते. ते करणाऱ्या भारतीय संघाला आणि त्यांच्या कर्णधाराला सलाम असे म्हणत त्यांने विराट कोहली आणि भारतीय संघाची स्तुती देखील यावेळी केली. मात्र, यानंतर रवी शास्त्री यांच्या या विधानावरुन सोशल मेडियातून खिल्ली उडवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका विजय मिळविल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुनील गावसकर सह अन्य टीकाकारांना चोख उत्तर देताना म्हटले की, माझा संघ रिकाम्या बंदुकीतून गोळ्या झाडत नाही. दुरून टीका करणाऱ्यांची विधाने ही “ट्रेसर बुलेट’ प्रमाणे असून आमच्या कामगिरीमुळे त्यांची टीका निष्प्रभ ठरली आहे.

भारतीय संघाने मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकल्यावर दुसरा सामना पर्थच्या मैदानावर गमावला होता. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली होती. त्यावेळी माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघ निवडीवर आणि रणनितीवर प्रश्‍न उपस्थीत करताना टीका केला होती तर भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक मुरली कार्तिकनेही “पर्थमधील पराभव हा जागे होण्याची वेळ’ असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

भारतीय संघाने 2-1 असा मालिका विजय मिळवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले की, मी मेलबर्न कसोटीच्या अगोदरही आमच्यावर टीका करणाऱ्याना उत्तर दिले होते. माझ्या खेळाडूंच्या प्रतिभेवर मला विश्‍वास होता आणि सामना जिंकण्याच्या प्रेरणेने ते किती झपाटले आहेत याचा मला नेमका अंदाज होता. म्हणून मी दक्षिण गोलार्धातून ऑस्ट्रेलियामध्ये टीका करणाऱ्यांच्या विधानांना फारसे महत्त्व दिले नाही, असेही ते म्हणाले.

मालिकेत विजय संपादन केल्यानंतर भारतीय संघाची स्तुती करताना शास्त्री म्हणाले, हा असा भारतीय संघ आहे जो सामना जिंकण्यासाठी कड्यावरूनही उडी घेण्याची मानसिकता ठेवतो. त्यांच्यामध्ये दृढनिश्‍चय आहे तर गरजेच्यावेळी कणखरपणा दाखवण्यातही हा संघ कमी पडत नाही. विजयाच्या प्रेरणेने खेळत धैर्य दाखवणाऱ्या भारतीय संघाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)