टी-20 संघातून धोनीला वगळले; विराट कोहलीला विश्रांती

नवी दिल्ली – आगामी वेस्ट इंडिज आणि आॅस्ट्रेलिया विरूध्दच्या टी-20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र यामध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी याला वगळण्यात आले आहे. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला वेस्ट इंडिजविरूध्दच्या तीन सामन्यांच्या टी-20 क्रिकेट मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

वेस्टइंडिजविरूध्दच्या मालिकेसाठी संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. मात्र आॅस्ट्रेलियाविरूध्दच्या मालिकेत विराट कोहलीच कर्णधार राहणार असून रोहित शर्माला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धोनीचा टी-20 क्रिकेट मालिकेत समावेश न करण्यात  आल्याने त्याची टी-20 क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात आली का अशी चर्चा रंगली आहे. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. याबदल स्पष्टीकरण देताना एमएसके प्रसाद म्हणाले की, धोनीची टी-20 क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात आली नसून त्याला पर्यायी खेळाडू (बॅकअप) म्हणून ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांची  यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

वेस्टइंडिज विरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), क्रुणाल पांड्या, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव.

आॅस्ट्रेलिया विरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर,  ऋषभ पंत (यष्टीरक्षक), क्रुणाल पांड्या, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)