जमशेदपूर-मुंबई लढतीत दोन्ही संघावर दडपण

जमशेदपूर – हिरो इंडियन सुपर लीगमध्ये शुक्रवारी जमशेदपूर एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघ बाद फेरीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दोन्ही संघांवर दडपण असेल. जमशेदपूरला सर्वस्व पणास लावून खेळावे लागेल. आता स्पर्धेचा निर्णायक टप्पा सुरु झाल्यामुळे प्रत्येक निकाल महत्त्वाचा आहे. त्यासाठी जमशेदपूरला विजयी मालिका सुरु करावी लागेल. जमशेदपूर सध्या 20 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. चौथ्या स्थानावरील प्रतिस्पर्ध्यापेक्षा ते तीन गुणांनी मागे आहेत. आता चारच सामने बाकी आहेत. त्यामुळे जमशेदपूरला गुण गमावून चालणार नाही.

जमशेदपूरचे प्रशिक्षक सेझार फरांडो यांनी सांगितले की, गेल्या तीन सामन्यांत एटीकेविरुद्ध 1-2 पराभव, गोव्याविरुद्ध बरोबरी, तर दिल्लीविरुद्ध विजय अशी कामगिरी आम्ही केली. यात आम्ही केवळ तीन गोल पत्करले आहेत. त्यामुळे बचाव ही समस्या आहे असे मला वाटत नाही. आम्ही प्रतीआक्रमणे आधी रोखायला हवी होती, पण म्हणून तुम्ही बचाव फळीला याचा दोष देऊ शकत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फरांडो यांच्या संघाला मागील पाच सामन्यांत एकच विजय मिळाला आहे. स्टार स्ट्रायकर टीम कॅहील याची गैरहजेरी, मायकेल सुसैराज याची दुखापत, गौरव मुखी व कार्लोस कॅल्वो यांच निलंबन अशा जमशेदपूरच्या समस्या आहेत. आयएसएलमध्ये मुंबईविरुद्ध आतापर्यंत एकही पराभव न होणे ही बाब त्यांचा आत्मविश्वास उंचावणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)