#ISL_Football : चेन्नईयीन एफसी आणि पुणे सिटीकडून साफ निराशा

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा

पुणे -आयएसएलच्या मागील मोसमाचे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईयीन एफसीच्या संघाने यंदाच्या मोसमात निराशाजनक कामगिरी करताना यंदा केवळ दोनच सामन्यात विजय मिळवू शकल्याने त्यांना यंद अखेरच्या स्थानी समाधान मानावे लागले. यंदा स्पर्धेत सर्वात समतोल संघ घेऊन मैदानात उतरलेल्या एफसी पुणे सिटीच्या संघाने पहिल्या टप्प्यात संपूर्ण निराशा केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात चांगली कामगिरी केली. मात्र त्यांची ही कामगिरी त्यांना बाद फेरीत पोहोचवण्यास
पुरेशी नव्हती.

एफसी पुणे सिटीला वेळीच सावरण्यात अपयश आल्याने त्यांचे आव्हान लवकरच संपुष्टात आले होते. मोसमाच्या प्रारंभी तीनच सामने झाल्यानंतर पुणे सिटीला प्रशिक्षक बदलावे लागले. निर्णायक विजय मिळविण्यात हा संघ झगडत होता. त्यामुळे मोहिमेला गती अशी येत नव्हती. हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांच्या चांगल्या प्रयत्नांमुळे संघ स्थिरावला. हिवाळी ब्रेकच्या सुमारास फिल ब्राऊन यांच्याकडे सूत्रे आली. अखेरच्या आठ सामन्यांत पुण्याचा एकच पराभव झाला. बाद फेरीसाठी झुंजण्याची क्षमता या संघाने दाखवून दिली. यामुळे पुढील मोसमासाठी हा संघ आतूर असेल.

तसेच दिल्लीची सुरुवात संथ होती. खेळाडूंना नवे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांच्या शैलीशी जुळवून घेण्यास वेळ लागला. अखेरीस हे घडले तेव्हा संघाची गुणतक्‍त्यात पीछेहाट झाली होती. तरुण खेळाडूंच्या संघाने उत्साहाच्या जोरावर दुसऱ्या टप्प्यात चांगला खेळ केला. लालीयनझुला छांगटे, नंदकुमार शेखर, डॅनिएल लालह्लीम्पुईया आणि विनीत राय अशा खेळाडूंसह गोम्बाऊ यांनी संघाचा पाया रचल्याचे दिसते. पुढील मोसमात या संघाने गुणवत्तेचे कामगिरीत रुपांतर करायला हवे. हा संघ भविष्यासाठी चांगला तयार झाला आहे.

मागील मोसमात बाद फेरी हुकल्यानंतर ब्लास्टर्सने नव्या आशेने सुरुवात केली होती. सलामीला एटीकेविरुद्ध विजय मिळविल्यानंतर मात्र या संघाचे निकाल घसरले. 14 सामन्यांत त्यांना विजय मिळविता आला नाही. तेथेच त्यांच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या. त्यांना दोनच विजय मिळविता आले. गोलांचा अभाव आणि पास हेरू शकेल अशा कल्पक खेळाडूची उणीव ब्लास्टर्सला भोवली. त्यामुळे हा संघ नवव्या क्रमांकावर फेकला गेला. साहल अब्दुल समाद हाच खेळाडू त्यांच्यासाठी आशास्थान ठरला. त्यामुळे त्याला मोसमातील

सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळाला. जेतेपद राखण्याच्या मोहीमेला अपयशी सुरवात झाल्यानंतर जॉन ग्रेगरी यांचा संघ कधीच सावरू शकला नाही. त्यांना दोनच सामने जिंकता आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)