रूपया 37 पैशांनी कोसळला, प्रति डाॅलर 72.12 रूपये या नव्या नींचाकावर

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून भारतीय रुपयाच्या मूल्यात वेगाने घट होत आहे. गुरूवारी रूपयाचे मूल्य 37 पैशांनी कमी होऊन 72.12 रूपये प्रति डाॅलर या नव्या नीचांकावर गेले आहे.

जून महिन्यापासून रूपयाच्या मूल्यात तब्बल 6.2 टक्क्यांनी घट झाली आहे. आज पहिल्यांदाच रूपयाचे मूल्य 72.12 रूपये प्रति डाॅलर नीचांकावर गेले आहे. क्रुडचे वाढणारे दर आणि व्यापारयुद्ध व अमेरिकेकडून होत असलेली व्याजदरवाढ या कारणामुळे रुपया घसरत आहे.

जर रुपयाचे मूल्य आणखी कमी होत गेले तर रिझर्व्ह बॅंकेला व्याजदरवाढीच्या शक्‍यतेवर विचार करावा लागणार असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. सध्याची परिस्थिती पाहता रुपया आणखी जास्त घसरण्याची शक्‍यता अधिक असल्याचे स्टेट बॅंकेच्या इकोरॅप या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)