भारतीय वैमानिकाची सुटका; मात्र ‘जैश’वर अवाक्षरही नाही

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पाकिस्तानच्या संसदेमध्ये बोलताना काल पाकिस्तानतर्फे पकडण्यात आलेल्या भारतीय वायुसेनेच्या वैमानिकाची पाकिस्तानकडून सुटका करण्यात येणार असल्याची माहिती दिली. भारतीय वायुसेनेच्या वैमानिकाला सोडून पाकिस्तान भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने पाकिस्तान पुढाकार घेत असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

यावेळी बोलताना इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेमध्ये जोरदार भाषण देखील ठोकले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना इम्रान खान यांनी “काश्मिरी युवक आत्मघातकी हल्ल्याचे टोकाचे पाऊल का उचलत आहे?” असा प्रश्न उपस्थित करत पाकिस्तानच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे खापर भारताच्या माथी फोडण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान यांनी केलेल्या या भाषणामध्ये त्यांनी शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असल्याचा वारंवार उल्लेख केला मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेबाबत अवाक्षर देखील काढले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकंदरीतच पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणातून भारतीय वैमानिकाची सुटका करण्याचा पाकिस्तानचा निर्णय शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशापेक्षा पाकिस्तानची जागतिक पटलावर भारताने केलेल्या कोंडीचा परिणाम असल्याचे जाणवते. पाकिस्तानवर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या देशांकडून दबाव वाढत असून अशा वेळी पाकिस्तानने आपली बारगळलेली प्रतिमा थोडीफार सुधारण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)