इंडियन पिअरची मार्केटयार्डात मोठी आवक

पुणे – हिरवट रंगाचे, तुरट, गोड चवीचे आणि आरोग्यासाठी गुणकारी असलेले इंडियन पिअर म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा इंडियन पिअरचा हंगाम सध्या जोरात सुरू झाला आहे. मार्केटयार्डातील फळविभागात इंडियन पिअरची रविवारी तब्बल 83 क्विंटल आवक झाली आहे. हंगामातील ही मोठी आवक आहे. घाऊक बाजारात 8 ते 10 किलोस दर्जानुसार 500 ते 1,200 रुपये भाव मिळत आहे.

सिमला, हिमाचल प्रदेश येथून मागील काही दिवसांपासून पिअरची आवक सुरू झाली आहे. सध्या हंगात बहरला आहे. त्यामुळे सर्वाधिक आवक झाल्याचे मार्केटयार्डातील व्यापारी प्रभाकर नवलदे यांनी सांगितले. नवलदे म्हणाले, मागील आठ ते दहा दिवसांच्या तुलनेत पिअरची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 8 ते 10 दिवसांपूर्वी 8 ते 10 किलो पिअरला घाऊक बाजारात 1,200 ते 1,600 रुपये भाव मिळत होता. आता आवक वाढल्याने त्यामध्ये घसरण झाली आहे. आणखी एक महिना पिअरचा हंगाम सुरू राहणार आहे. आता आवक थोडी थोडी कमी होत जाणार आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्यास भावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी पिअर खाण्याची हीच योग्य वेळ आहे. येथील बाजारातून पुणे शहर, जिल्हासह सातारा, नगर जिल्ह्यांत पिअर विक्रीसाठी जात असतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)