चिंचवडमधील इंडियन ओवरसीज बँकेला आग

चिंचवड : चिंचवड येथील इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेमध्ये आज सायंकाळी ७.३०च्या सुमारास अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी एसीमध्ये बिघाड झाल्याने बँकेच्या शाखेमध्ये जमा झालेला धूर काचा फोडून बाहेर काढला असून बँकेचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत

पिंपरी व निगडी प्राधिकरण अग्निशामकच्या दोन गाड्या सध्या घटनास्थळी उपस्थित असून परिस्थिती आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)