#CWC19 : भारतीय सलामीवीरांनी मोडला विक्रम

मँचेस्टर – शिखर धवनच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या लोकेश राहुल आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून 23 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना या दोघांनी सचिन तेंडुलकर व नवज्योत सिद्धू यांचा विक्रम मोडला. या दोघांनी 1996 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 90 धावांची भागीदारी केली होती. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय सलामीवीरांची ही सर्वोत्तम कामगिरी होती. आज तो विक्रम रोहित व राहुल यांनी तोडला.

वर्ल्ड कप स्पर्धेतील ही भारतीय सलामीवीरांनी केलेली आठवी शतकी भागीदारी आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्ध प्रथमच त्यांना अशी कामगिरी करता आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here