रुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी

काठमांडू (नेपाळ): नेपाळ सरकारने रु. 200, 500 आणि 2,000 किमतीच्या भारतीय नोटांवर बंदी घातली आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाने सोमवारी हा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीच्या या निर्णयाची माहिती देताना सरकारी प्रवक्ते गोकुल बास्कोटा यांनी सांगितले आहे, की, यापुढे नेपाळमध्ये रु. 200, 500 आणि 2,000 किमतीच्या भारतीय नोटा जवळ ठेवणे, त्याबदली काही खरेदी करणे वा अशा नोटा भारतातून नेपाळमध्ये आणणे बेकायदेशीर झाले आहे.

नेपाळकडे सुमारे आठ कोटी रुपये किमतीच्या जुन्या (रद्द करण्यात आलेल्या) भारतीय नोटा असल्याचे नेपाळच्या राष्ट्रीय बॅंकेने म्हटले होते. या मुद्‌द्‌यावर नेपाळने भारताकडे नाराजी व्यक्त केली होती. रु. 200. 500 आणि 2,000 च्या नवीन भारतीय नोटा नेपाळमध्ये बेकायदेशीर ठरवण्यामागे हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.
रु. 200, 500 आणि 2,000 किमतीच्या भारतीय नोटांवर नेपाळ सरकारने बंदी घातल्याने व्यापारी आणि पर्यटक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)