अंदमान येथे भारतीय नौदलाचा नवा तळ

-चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींवर लक्ष ठेवणार

-चीनने श्रीलंका व पाकनजीक वाणिज्यिक तळ उभारले

-हिंदी महासागरातून वर्षाला सव्वा लाख जहाजांचा प्रवास

नवी दिल्ली – हिंदी महासागरात प्रवेश करणाऱ्य़ा चीनच्या नौका तसेच पाणबुड्यांवर नजर ठेवण्यासाठी भारत अंदमान-निकोबार बेटसमूहातील स्वतःचा तिसरा नौदल तळ कार्यान्वित करणार आहे. चीनने श्रीलंकेपासून पाकिस्तानपर्यंत वाणिज्यिक बंदरांचे जाळे तयार करण्याचे सत्र आरंभिले आहे. या बंदरांचा वाणिज्यिक ऐवजी चीनचा सैन्यतळ म्हणून वापर होण्याची शक्‍यता अधिक आहे. चीन या बंदराचा स्वतःच्या नौदलासाठी वापर करत असल्याचे या अगोदरच समोर आले आहे.

मलाक्का सामुद्रधुनी प्रवेश मार्गानजीक अंदमान बेट असल्याने त्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. आयएनएस कोहासा हा नवा तळ नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा हे राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यावर 1000 मीटर लांबीची धावपट्टी असून त्याचा वापर हेलिकॉप्टर्स तसेच डॉर्नियर टेहळणी विमानांसाठी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींबद्दल भारत अत्यंत सतर्क आहे. 2014 मध्ये चीनच्या पाणबुडीने श्रीलंकेच्या कोलंबो बंदरावर तळ ठोकला होता. दरवर्षी सुमारे 1 लाख 20 हजार जहाजे हिंदी महासागरातून जात असतात आणि यातील सुमारे 70 हजार जहाजे मलाक्का सामुद्रधुनीतून प्रवास करतात.

चीनची उपस्थिती सातत्याने वाढत असून त्याच्या हालचालींवर नजर ठेवायची असल्यास अंदमान बेटावर पुरेशी सज्जता करण्याची गरज निर्माण झाली आहे. हवाईतळ असल्यास मोठया भागावर नजर ठेवणे शक्‍य होणार आहे. पुढील टप्प्यात नौदल तेथे अधिकाधिक नौकांना कायमस्वरूपी तैनात करणार असल्याचा दावा नौदलाचे निवृत्त अधिकारी अनिल जयसिंग यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)