भारतीय औषधांना अमेरिकेत मान्यता

नवी दिल्ली – मोरपेन लेबोरेटरीजच्या हिमाचल प्रदेशातील दोन मॅन्युफॅक्‍चरिंग प्रकल्पांना अमेरिकेच्या एफडीएची मान्यता प्राप्त झाली आहे. कंपनीच्या हिमाचल प्रदेशातील बद्दी प्लांटमध्ये तयार होणाऱ्या कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या बल्क ड्रगला व मसूलखाना प्लांटमध्ये तयार होणाऱ्या दम्याच्या औषधांना एफडीएने मान्यता दिली आहे.

या एफडीएच्या मंजूर नंतर आता हे दोन्ही औषधे अमेरिकन बाजारात निर्यात केले जातील. कंपनीचे अध्यक्ष सुशील सुरी म्हणाले की, अमेरिकेच्या एफडीएने औषधांच्या निर्मितीसाठी कंपनीच्या दुहेरी परवानगीने इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. अमेरिकेत बाजारात कोलेस्टारलवरील औषधाची बाजारपेठ सुमारे 5,000 कोटीची आहे. तर दम्यावरील औषधाची बाजारपेठ सुमारे 2000 कोटीची आहे. ही दोन्ही औषधे मोरपेन लेबोरेटरीजच्या उलाढालीत 150 कोटी रुपयांचे योगदान करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)