पाकिस्तानी मदनिकेच्या जाळ्यात भारतीय जवान-तपास जारी

जयपूर (राजस्थान): पाकिस्तानी मदनिकेच्या जाळात 45 भारतीय जवान सापडल्याचे उघडकीस आले आहे. ही पाकिस्तानी मदनिका म्हणजे एक पाकिस्तानी एजंट असून फेसबुकच्या माध्यमातून तिने भारतीय जवानांवर मायाजाल पसरल्याचे उघडकीस आले आहे. जैसोलमर येथे तैनात भारतीय लष्कराचा जवान सोमवीर याला या संबंधात अटक करण्यात आली आहे. तपासात त्याच्याकडून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत.

अनिका चोप्रा असे खोटे नाव घेऊन तिने आपला फेसबुक अकाऊंट उघडला होता. ती स्वत: लष्करी नर्सिंग सेवेतील कॅप्टन असल्याचे सांगत होती. तिने जवानांशी दोस्ती सुरू केली होती. सोमवीर सिंह हा तिच्या जाळ्यात अडकलेला पहिला पक्षी होता. सन 2016 मध्ये दोघांची फेसबुकवर दोस्ती सुरू झाली. त्त्यानंतर सोमवीरच्या फ्रेंड्‌स लिस्टमधील जवानांवर तिने मायाजाल टाकणे सुरू केले. या सर्वांवर आता एमआय (मिलिटरी इंटेलिजन्स) ची करडी नजर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेसेंजर सुरू झालेली त्यांची दोस्ती पुढे व्हिडियो कॉलपर्यंत गेली. व्हिडियो कॉल्समध्ये अनिका विवस्त्र होऊन डान्स करत असे. त्यांच्याबरोबर विवाहाचे वचन देत असे. तिच्या जाळ्यात सापडलेल्या अनेकांनी तिच्यासाठी देशाबरोबर दगाबाजी करण्यास नकार दिला, पण सोमवीरला मात्र तिचा मोह सुटला नाही.

सोमवीरच्या विरोधात पुरावा मिळताच त्याला अटक करण्यात येऊन 18 जानेवारीपर्यंत पोलीस रिमांड देण्यात आला आहे.
जैसोलमरपूर्वे सोमवीर महाराष्ट्रातील अहमदनगर येथे तैनात होता. फेसबुकच्या माध्यमातून त्याने अनिका चोप्राला अर्जुन टॅंकच्या कयायतीचे व्हिडियो पाठवल्याचा आरोप आहे.

आपले गुपित उघड होताच अनिका चोप्राने फेसबुकवरील आपली फ्रेंडस लिस्ट आणि माहिती लपवली आहे. बॅंक खात्यांचा तपास केल्यावर तिने सोमवीरच्या दिल्लीतील एका बॅंकेच्या खात्यात जून 2018 मध्ये पाच हजार रुपये जमा केले होते.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)