पर्थ – भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून संघाने आपल्या पहिल्या सामन्यात पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या थंडरस्टिक्स संघावर 2-0 ने विजय नोंदवून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची विजयी सुरुवात केली.
वीरेंद्र लाक्रा याने 23 व्या तसेच हरमनप्रीतने 50 व्या मिनिटाला गोल केला. भारताला 15 तसेच 17 मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या राष्टलीय संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. उभय संघांनी पहिल्या क्वॉर्टरमध्ये वेगवान खेळ करीत गोल नोंदविण्याच्या उत्कृष्ट संधी निर्माण केल्या होत्या. दुसऱ्या सत्रात भारताने 23 व्या मिनिटाला तर, चौथ्या सत्रामध्ये 50 व्या मिनिटाला गोल करत विजय मिळवला.