#हॉकी: भारतीय पुरुष संघाची पाचव्या स्थानावर झेप

जागतिक हॉकी मानांकन यादी

नवी दिल्ली: गेल्या महिन्यात हॉलंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताच्या पुरुष हॉकी संघाने नव्या जागतिक मानांकन यादीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जागतिक हॉकी महासंघाने आज जाहीर केलेल्या विश्‍वक्रमवारीत विद्यमान स्थानापेक्षा प्रगती करणारा पहिल्या दहात भारत हा एकमेव संघ ठरला आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्य अंतिम सामन्यात निर्धारित वेळेअखेर 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा टायब्रेकरमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या विश्‍वक्रमवारीत जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाने 1906 गुणांसह आपले अग्रस्थान कायम राखले आहे. ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाने 1883 गुणांसह दुसरे स्थान राखले असून बेल्जियम (1709) आणि हॉलंड (1654) यांचे तिसरे व चौथे स्थान कायम राहिले आहे. परंतु भारतीय संघाने बलाढ्य जर्मनीला मागे टाकून 1484 गुणांसह पाचवे स्थान निश्‍चित केले आहे. जर्मनी, इंग्लंड, स्पेन, न्यूझीलंड आणि आयर्लंड हे अव्वल 10 मधील अन्य संघ आहेत. मलेशिया हा आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम संघ असून तो 12व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पाकिस्तान व कोरिया 13 व 14व्या स्थानावर आहेत. महिलांच्या क्रमवारीतही भारतीय महिला हॉकी संघाने नववे स्थान पटकावले असून आशियाई देशांमध्ये भारतीय महिला सर्वोच्च स्थानावर आहेत. महिला गटांत हॉलंड अग्रस्थानी असून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना व जर्मनी त्यापाठोपाठ आहेत. जागतिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या आयर्लंडने आठव्या क्रमांकावर झेप गेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)