भारतीय हॉकी संघाची यजमान ओमानशी सलामी

आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा

नवी दिल्ली: या वर्षाच्या उत्तरार्धात ओमानमध्ये पार पडणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या वेळापत्रकाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. आशियाई हॉकी संघटनेनेने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार भारतीय पुरुष हॉकी संघाची सलामीची लढत यजमान ओमानशी होणार असून दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे.

येत्या 18 ते 28 ऑक्‍टोबरदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत भारतासह मलेशिया, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, जपान आणि ओमान हे संघ सहभागी होणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वरमध्ये पार पडणाऱ्या हॉकी विश्‍वचषक स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी सर्वच संघांना ही स्पर्धा उपयोगी ठरणार आहे. पाकिस्तान, दक्षिण कोरिया व जपानसारख्या संघांमुळे या स्पर्धेचा दर्जा उच्च असण्याची खात्री मिळाली आहे.

आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना यजमान ओमानविरुद्ध 18 ऑक्‍टोबर रोजी होणार असून त्यानंतर 20 ऑक्‍टोबर रोजी भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान आहे. दुसऱ्याच दिवशी 21 ऑक्‍टोबर रोजी भारतला जपानशी झुंज द्यावी लागणार असून एका दिवसाच्या विश्रांतीनंतर 23 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघासमोर मलेशियाचे कडवे आव्हान राहील. त्यानंतर 24 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या पुढच्या सामन्यात भारतला दक्षिण कोरियाशी लढत द्यावी लागणार आहे. स्पर्धेतील उपान्त्य फेरीचे दोन्ही सामने, तसेच पाचव्या व सहाव्या क्रमांकासाठीचा सामना 27 ऑक्‍टोबर रोजी होणार असून 28 ऑक्‍टोबर रोजी तिसऱ्या व चौथ्या स्थानाकरता व अंतिम सामना रंगणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)