#INDvESP : भारतीय महिलांनी स्पेनला बरोबरीत रोखले

मुरसिया  -पहिल्या हॉकी सामन्यातील पराभवानंतर भारतीय महिला संघाने स्पेनच्या महिलांना दुसऱ्या संघर्षपूर्ण सामन्यात 1-1 असे बरोबरीत रोखले आहे. भारतासाठी गुरजीत कौरने 43 व्या मिनिटाला गोल केला होता तर स्पेनच्या मारिया टोस्टने 49 व्या मिनिटाला गोल करत स्पेनला बरोबरी साधून दिली.

पहिल्या सामन्यात 3-2 असा पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने दुसऱ्या सामन्यात आपला खेळ उंचावत आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सत्रात भारतीय संघाचे वर्चस्व राहिले परंतु गोल करण्यात त्यांना अपयश आले. दुसऱ्या सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नर बहाल करण्यात आला पण दोन वेळा प्रयत्न करूनही भारताला गोल करता आला नाही. त्यानंतर मध्यंतर झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्यंतरानंतर स्पेनने आक्रमक खेळ करत स्पेनने पनल्टी कॉर्नर कमविला. परंतु, भारतीय गोलकीपरने त्यांना यश येऊ दिले नाही आणि प्रतिआक्रमणात भारताने पलटी कॉर्नर मिळवला. त्यावर ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरने गोल करत 43 व्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. परंतु 49 व्या मिनिटाला स्पेनने मैदानी गोल करत सामना बरोबरीत सोडवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)