पाकिस्तान माध्यमांनी वाजपेयींना दिली ‘शांतिदूत’ असल्याची उपमा

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न आणि भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर देशभरातील सर्वच माध्यमामध्ये, वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या निधनाचे वृत्त प्रकाशित झाले. साऱ्यांनीच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

विशेष म्हणजे भारतासह पाकिस्तानमध्ये प्रकाशित सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये देखील अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला आहे.

-Ads-

पाकिस्तानमधील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र ‘द डाॅन’ यांनी पहिल्या पानांवर वाजपेयी यांच्या निधनाबाबत एक छोटीसी बातमी छापली आहे.

वृत्तपत्राच्या तिसऱ्या पानावर विस्तृत बातमी दिली आहे. त्यासोबतच त्यांनी भारत आणि पाक यांच्यातील शांतिदूत असे म्हटले आहे.

‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृतपत्राने अापल्या पहिल्या पानावर वाजपेयी यांचा हसतानाचे छायाचित्र लावले आहे आणि आतल्या पानामध्ये विस्तृत लिहले आहे. ‘इंटरनॅशनल द न्यूज’ या इंग्रजी वृत्तपत्राने देखील वाजपेयी यांची बातमी पहिल्या पानावर छापली आहे. ‘जंग’ या उर्दू न्यूज पोर्टलने अटलजींच्या संबंधित तीन बातम्या प्रकाशित केल्या आहेत.

पाकिस्तानमध्ये देखील ट्विटरवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचा विषय ट्रेडिंगमध्ये राहिला आहे. पाकिस्तानमधील लोकांनीदेखील त्यांच्या निधनावर दुख व्यक्त केले आहे. जास्त करून लोकांनी १९९९ मध्ये त्यांनी केलेल्या लाहोर बस यात्रेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

तसेच अनेकांनी वाजपेयीं यांच्या निधनास एका युगाचा अंत असे म्हटले आहे. बऱ्याच जणांनी मानले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न अटलजींना केला पण आम्ही तो असफल केला. पाकिस्तानचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता यांनी ‘जंग न होने देंगे’ ही अटलजींची कविता ट्विट केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)