फुटबॉल : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली – अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने एएफसी आशियाई करंडक स्पर्धेसाठी 23 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाच जानेवारीपासून ही स्पर्धा होईल. ब्ल्यू टायगर्स असे बिरूद भारतीय फुटबॉल संघाला देण्यात आले आहे. एकूण चौथ्यांदा आणि आठ वर्षानंतर प्रथमच भारतीय संघ या स्पर्धेत खेळेल.

भारताने 24 संघांच्या पात्रता फेरीत किर्गीझ प्रजासत्ताक, म्यानमार आणि मकाऊ यांच्याविरुद्ध खेळत आपले स्थान नक्की केले. भारताचा अ गटात समावेश आहे. बहारीन, थायलंड आणि यजमान अमिराती हे भारताचे प्रतिस्पर्धी आहेत. सहा जानेवारी रोजी अबुधाबीत थायलंडविरुद्ध भारताचा पहिला सामना होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने फिफा क्रमवारीत 170 वरून शंभरच्या आत मजल मारली आले. 2015च्या स्पर्धेस पात्र ठरण्यात अपयश आल्यानंतर भारताने ही कामगिरी साध्य केली. 13 सामन्यांत अपराजित राहण्याची मालिकाही यात समाविष्ट आहे. इंग्लंडच्या कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2017 मध्ये तिरंगी करंडक आणि यंदा मायदेशात आंतरखंडीय करंडकसुद्धा जिंकला आहे. भारतीय संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी सज्ज होत असताना खेळाडूंचा आपण आजपासून परिचय करून घेऊया.

बेंगळुरू एफसी

गुरप्रीत 2017 मध्ये नॉर्वेतील स्टॅबाएक क्‍लबकडून हिरो इंडियन सुपर लीगमधील बेंगळुरू एफसीकडे दाखल झाला. तेव्हापासून त्याने क्‍लब आणि देशासाठी चमकदार कामगिरी केली आहे. कॉन्स्टंटाईन यांच्यासाठी तो पहिल्या पसंतीचा गोलरक्षक आहे. गेल्या काही वर्षांत त्याने भारतासाठी संस्मरणीय कामगिरी नोंदविली आहे. उंचीला उत्तम निर्णयप्रक्रियेची जोड देत तो हालचाली करतो. त्यामुळे तो व्यापक क्षेत्र कव्हर करू शकतो. बॉक्‍समध्ये येणारे चेंडू रोखण्यासाठी त्याचा पर्याय सुरक्षित मानला जातो.

-गुरप्रीतसिंग संधू गोलरक्षक

मुंबई सिटी एफसी

अमरिंदरने कारकिर्दीची सुरुवात स्ट्रायकर म्हणून केली. त्यावेळी त्याच्यामधील गोलरक्षकाचे कौशल्य प्रशिक्षकांनी हेरले. राष्ट्रीय पातळीवर गुरप्रीतनंतर दुसऱ्या पसंतीचा गोलरक्षक अशी भूमिका पंजाबच्या अमरिंदरने बजावली आहे. तो पुणे एफसी, एटीके आणि बेंगळुरू एफसी यांच्याकडून पूर्वी खेळला आहे. बेंगळुरूकडून त्याने एएफसी करंडक उपांत्य फेरीत भाग घेतला आहे. सध्या मुंबई सिटीकडे असलेला अमरिंदर देशातील सर्वोत्तम गोलरक्षकांमध्ये गणला जातो. त्याची चपळाई अप्रतिम आहे.

-अमरिंदर सिंग गोलरक्षक(राखीव)

बेंगळुरू एफसी

राष्ट्रीय संघाचा अनभिषिक्‍त शिलेदार असा लौकिक असलेल्या सुनील छेत्री याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तो संघाचा दीर्घकाळापासूनचा आधारस्तंभ आहे. देशाकडून त्याने सर्वाधिक गोल केले आहेत. कोणत्याही क्षणी निर्णायक प्रभाव पाडण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तो वाढत्या वयागणिक बहरतो आहे. तो परिपूर्ण सेंटर फॉरवर्ड बनला आहे. दिल्लीत जन्मलेल्या छेत्रीने आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत कोलकत्यामधील दोन्ही मातब्बर क्‍लबचे प्रतिनिधित्व केले आहे.

-सुनील छेत्री (कर्णधार)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)