पाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद

एलओसीलगत शस्त्रसंधी भंगाची आगळीक

जम्मू -पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा आगळीक करताना सोमवारी भारतीय हद्दीत मारा केला. त्या माऱ्यात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. ती घटना जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली. पाकिस्तानी सैनिकांनी सकाळच्या सुमारास राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी क्षेत्रात तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबार केला. त्यामध्ये सीमा नाक्‍यावर तैनात असणारा एक भारतीय जवान गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला तातडीने लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले.

मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. पाकिस्तानी सैनिकांकडून काही तास अधूनमधून मारा चालू होता. त्यामुळे सीमेलगत राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली. सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना त्यांना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या. पाकिस्तानी माऱ्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी बाजूचे किती नुकसान झाले, ते तातडीने समजू शकले नाही. पाकिस्तानी सैनिकांनी मागील तीन दिवसांत दुसऱ्यांदा जम्मू विभागात शस्त्रसंधीचा भंग करून मारा केला. याआधी त्यांनी शनिवारी पूँच जिल्ह्याच्या मेंढार क्षेत्राला लक्ष्य केले होते. त्यात एक भारतीय नागरिक जखमी झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)