अमेरिकेतील पाक दूतावासाबाहेर भारतीयांची निदर्शने

न्युयॉर्क – जम्मू काश्‍मीरमध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ न्युयॉर्कमधील पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर भारतीय नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी 100 पेक्षा अधिक भारतीय नागरिकांनी भारत आणि अमेरिकेचे ध्वज फडकावत ‘ग्लोबल टेरर पाकिस्तान’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा दिल्या. तर, अमेरिकेच्या न्युजर्सीमध्ये पुलवामातील शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिली.

पुलवामा येथील हल्ल्यामुळे भारत कठोर भूमिका घेण्याच्या विचारात असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर भारतीयांनी निदर्शने होत आहेत. संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता. तसेच दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत या घटनेतील दोषींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे. सुरक्षा परिषदेमध्ये या प्रकारच्या भूमिकेमुळे हा पाकिस्तानला बसलेला मोठा झटका मानला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)