अश्‍विन नक्‍कीच पुनरागमन करेल – चेतेश्‍वर पुजारा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना

सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान येत्या गुरुवारी (6 डिसेंबर) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवला जाणार असून या मालिकेत भारतीय अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विन आपल्या फिरकी गोलंदाजीद्वारे नक्‍कीच पुनरागमन करेल असा विश्‍वास भारतीय संघातील मधल्याफळीतील फलंदाज चेतेश्‍वर पुजाराने व्यक्त केला आहे.

-Ads-

आपल्या फिरकी गोलंदाजीने जगभरातील भल्या भल्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या रविचंद्रन अश्‍विन ऑस्ट्रेलियात मात्र अपयशी ठरला आहे. त्याने येथे सहा कसोटी सामन्यांमध्ये 54.71च्या सरासरीने 21 बळी मिळवले आहेत. तर, ऑस्ट्रेलिया वगळता इतर ठिकाणी त्याच्या गोलंदाजीची सरासरी 25.44 असून त्याने 336 बळी मिळवले आहेत. त्यातच कसोटी सामन्यापुर्वी झालेल्या सराव सामन्यामध्ये अश्‍विन अपयशी ठरला होता. त्याने त्या सामन्यात तब्बल 122 धावा देताना केवळ 2 गडी बाद केले होते.

सराव सामन्यातील त्याच्या कामगिरीनंतर त्याच्यावर टिका केली जात असताना पुजाराने अश्‍विनची पाठराखन केली असून यावेळी पुढे बोलताना तो म्हणाला की, अश्‍विनहा चांगला गोलंदाज आहे त्याच्या भात्यात अनेक वेगवेगळी चेंडू आहेत. त्या मुळे तो कोणत्याही क्षणी संघाला बळी मिळवून देऊ शकतो. तशी त्याच्यात प्रतिभा आहे. त्यामुळे तो या मालिकेत आपली योग्यता दाखवून देईल असेही त्याने यावेळी सांगितले. अश्‍विनहा हुशार गोलंदाज आहे तो फलंदाजाच्या मनात काय सुरू आहे हे ओळखतो आणि त्या नुसार गोलंदाजी करतो. तसेच गेल्या काही काळा पासून त्याने आपल्या गोलंदाजीतही बदल केले आहेत त्यामुळे त्याची गोलंदाजी आणखिनच चांगली झालेली आहे. त्याने नेमके काय बदल केले आहेत ते मी सांगु शकत नाही मात्र त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची धार वाढली आहे. असेही तो यावेळी म्हणाला.

तसेच भारतीय फलंदाजी बद्दल बोलताना पुजारा म्हणाला की, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेतील पराभवाने आम्ही निराश झाअलेलो आहोत मात्र त्याचा कोणताही परिणाम येथिल सामन्यांवर होणार नाही. कारण सध्या संघातील जवळपास सर्वच फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत तर आमची गोलंदाजी हे सध्याच्या कोणत्याही संघापेक्षा चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे त्यामुळे सध्या आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. आम्ही फलंदाजी करताना काही लक्ष्य आमच्या समोर ठेवले आहेत त्यानुसार आम्ही आमचा खेळ करणार आहोत. जर आम्ही त्याप्रकारे खेळ केला तर संघातील फलंदाजांवर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही.

आम्हाला यादौऱ्यात आमच्या मागिल दौऱ्याचा अनुभव कामी येणार आहे. कारण, तुम्ही ज्या मैदानांवर खेळलेले आहेत त्या मैदानांच्या खेळपट्ट्यांचा तुम्हाला अंदाज आलेला असतो. त्याच प्रमाणे तुम्ही या पुर्वी सामना केलेल्या गोलंदाजांचे सामर्थ्य आणि त्यांच्यातील दुर्बलपणा माहित असतो त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला फलंदाजी करताना घेता येऊ शकतो. असेही त्याने यावेळी नमूद केले.

तसेच तो पुढे बोलताना म्हणाला की, ही आमच्यासाठी नविन सुरूवात जरी असली तरी सध्या आमचे काही फलंदाज लयीत आहेत. तर, काही फलंदाजांनी चांगली कामगिरी करत आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये आम्ही ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ ठरू याचा आम्हाला विश्‍वास आहे असेही त्याने यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)