मोदी सरकारमधील मंत्र्याने दिला ‘धोनीला निवृत्तीचा सल्ला’

नवी दिल्ली – भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टनम येथे खेळला गेला. हा सामना बरोबरीत सुटला. भारतीय फलंदाजीत विराट कोहली याने दमदार कामगिरी करत 157 धावा केल्या. या कामगिरीसाठी विराटला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

तर दुसरीकडे एम.एस.धोनी हा 25 चेडूंत केवळ 20 धावा करत बाद झाला. धोनीची कालची कामगिरी पाहता मोदी सरकारमधील मंत्री बाबुल सुप्रियो इतके दु:खी झाले की त्यांनी ‘महेंद्रसिंग धोनी’ याला निवृत्त होण्याचा सल्लाच दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘आज एमएस धोनी ज्याप्रकारे आउट झाला ते स्वीकारले जाऊ शकत नाही. एमएस धोनीचा मोठा चाहता असतानादेखील माझ्या मते त्याने आता आपल्या कारकिर्दीबदल विचार केला पाहिजे. धोनीने निवृत्ती घेण्याची वेळ आली का ?, असहमती करिता आपले स्वागत आहे’.

काही युजर्सनी ‘बाबुल सुप्रियो’ यांच्या ट्विटला समर्थन दिले आहे तर काहीनी धोनी आजून खूप काळ क्रिकेट खेळू शकतो असे म्हटलं आहे. दरम्यान धोनी हा गेल्या 14 वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 मध्ये टी-20 क्रिकेट विश्वचषक,2011 विश्वचषक आणि चॅम्पियन ट्राफी जिकंली आहे. धोनीने कसोटीमधून याआधीच निवृत्ती घेतली असून सध्या तो एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)