पंजाब – 2019 लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज सर्वत्र मतदान पार पडत आहे. सातव्या टप्प्यात एकूण 59 जागांसाठी हे मतदान होत असून एकूण 918 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. यामध्ये बिहारमध्ये 8, हिमाचल प्रदेशमध्ये 4, झारखंड 3, मध्य प्रदेशात 8, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 9 तर चंदीगड एका जागेवर मतदान पार पडणार आहे. यावेळी भारतीय क्रिकेटपटू ‘हरभजन सिंग’ देखील आपला मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचला आहे.
#Punjab: Cricketer Harbhajan Singh waits in queue to cast his vote at a polling booth in Jalandhar’s Garhi village. pic.twitter.com/Fo2triU623
— ANI (@ANI) May 19, 2019
जलंदर मधील गढ़ी गावातील एका मतदान केंद्राबाहेर हरभजन आपले मत देण्यासाठी रांगेत उभा होता. पंजाब मध्ये ऐकून 13 जागांसाठी मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सुमारे दहा कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.