भारतीय वंशाच्या नेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी 

वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या विधीज्ञ नेयोमी जेहांगिर राव यांचा अमेरिकेतील सामर्थ्यशाली कोलंबिया सर्किट कोर्ट ऑफ अपील्स या न्यायालयाच्या सर्किट न्यायाधीशपदी शपथविधी झाला आहे. “सर्किट कोर्ट ऑफ अपील्स’ हे न्यायालय अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या खालचे दुसऱ्या क्रमांकाचे न्यायालय मानले जाते.

वादग्रस्त न्यायाधीश ब्रेट कवानाफ यांच्या जागेवर राव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश क्‍लॉरेन्स थॉमस यांनी व्हाईट हाऊसमधील रुसवेल्ट दालनातल्या कार्यक्रमात पती ऍलान लेफ्कोविझ यांच्यासह आलेल्या राव यांना न्यायाधीश पदाची शपथ दिली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. पारशी कुटुंबात डेट्रॉईट येथे जन्मलेल्या नेयोमी राव या वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या दुसऱ्या भारतीय वंशीय आहेत. त्यांच्यापूर्वी श्री श्रीनिवासन या न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)