इंडियन बँकेमध्ये नोकरीची संधी

नवी दिल्ली – इंडियन बँकेमध्ये प्रोबेशनरी आॅफिसर पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (1 आॅगस्ट) सुरू करण्यात आलेली आहे.याबदल आज नोटीफेकेशन जाहीर करण्यात आलेले आहे. प्रोबेशनरी पदाच्या एकूण 417 जागा उपलब्ध आहेत. उमेदवार 27 आॅगस्टपर्यत अाॅनलाईन अर्ज करू शकतात.

जर तुम्हाला या पदाकरीता अर्ज करायचा असेल तर किमान पदवीधर असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षादरम्यान असावे. उमेदवाराची निवड पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या माध्यमातून होईल. पूर्व परिक्षा 6 आॅक्टोबरला होईल तर 4 नोव्हेंबरला मुख्य परीक्षा होईल. अधिक माहितीसाठी उमेदवार इंडियन बॅकेच्या संकेतस्थळावर ( indianbank.in ) जाऊन अर्ज करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)