भारतीय अंतराळवीरांची “गगनयान’ भरारी

– दोन मानवरहित याने सोडण्याचे नियोजन
– अंतराळवीर घेऊन जाणारे पहिले यान 40 महिन्यांत

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. हा विक्रम असणार आहे अवकाशात अंतराळवीर पाठवण्याचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इस्रोच्या “गगनयान’ उपक्रमाला मंजुरी देण्यात आली. या योजनेनुसार 2022 पर्यंत भारताचे तीन अंतराळवीर 7 दिवसांसाठी अंतराळात जाणार आहेत. ही योजना पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आखण्यात येणार आहे.
या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी भाषण करताना केली होती. 2022 पर्यंत किमान एक भारतीय अंतराळात झेप घेईल, असे ते म्हणाले होते. 2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“गगनयान’ उपक्रमासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. यात तंत्रज्ञान विकास, उड्डाणासाठीचे हार्डवेअर आणि आवश्‍यक पायाभूत घटकांच्या खर्चाचा समावेश आहे. गगनयान उपक्रमात दोन मानवरहित आणि एक मानवसहित यानाचा समावेश आहे. यासाठी जीएसएलव्ही एमके-111 रॉकेट लॉंचरला वापर करण्यात येणार आहे.
यामुळे वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षमता यांना चालना मिळणार आहे. या उपक्रमामुळे प्रगत तंत्रज्ञानामध्ये रोजगारनिर्मितीची अपेक्षा व्यक्‍त होत आहे. राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानात करिअर करण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. ही योजना यशस्वी झाली तर जगातल्या मोजक्‍या देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे.

अंमलबजावणी धोरण आणि लक्ष्ये
या योजनेसाठी इस्रोने एक खास टीम तयार केली आहे. गगनयान उपक्रम राष्ट्रीय प्रयत्न आहे. सदस्यांचे प्रशिक्षण, मानव जीव विज्ञान, तंत्रज्ञान विकास तसेच आरेखन अवलोकनात राष्ट्रीय संस्था, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संस्था यात सहभाग होतील. अंतराळवीर घेऊन जाणाऱ्या पहिल्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक मंजुरीपासून 40 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी पूर्ण तयारीनिशी दोन मानवरहित याने सोडण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)